आज भारत आणि इंग्लंड विरुद्ध पहिला टी 20 सामना

0

अहमदाबाद : कसोटी मालिकेतील यशानंतर आता भारतीय टीम आजपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरोधातील टी20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. आज (12 मार्च) सायंकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.

आतापर्यंत भारताने 14 वेळा इंग्लंडसोबत टी20 सामना खेळला आहे. यामध्ये दोन्ही संघ सात वेळा विजयी झाल्या आहेत. भारतात इंग्लंडने भारताविरुद्ध सहा वेळा मॅच खेळली आहे. ज्यापैकी तीन मॅच जिंकण्यात इंग्लंडला यश मिळाले आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा दोन महिन्यांनी मैदानावर परतला आहे. रवींद्र जाडेजा अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. अशातच आपल्या दुखापतीतून सावरल्यानंतर जाडेजाने पुन्हा एकदा संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर रवींद्र जाडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी करताना दिसला. रवींद्र जाडेजाने स्वतः पुन्हा संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली असल्याची माहिती दिली. जाडेजाने मैदानावर वापसीचा व्हिडीओही शेअर केला आहे. जाडेजाने लिहिलं की, “दोन महिन्यांनी मैदावार उतरल्यानंतर चांगंल वाटत आहे

संभाव्य टीम
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिर पांड्या, वॉशिग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, टी नटराजन
इंग्लंड : इयोन मोर्गेन (कर्णधार) जोस बटलर (विकेकीपर), जेसन रॉय, डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल रशीद, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here