चिपळूण, रत्नागिरी, लांजा बसस्थानक इमारतीप्रश्नी न्यायालयात दाद मागणार; अॅड. ओवेस पेचकर यांचा इशारा

0

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, लांजा आणि रत्नागिरी येथील एस.टी. स्थानकांच्या इमारतींचे काम प्रलंबित असल्याने याबाबत आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा अॅड. ओवेस पेचकर यांनी दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणीअसणाऱ्या चिपळूण बसस्थानकाची इमारत पाडून तीन वर्षे होत आली तरी हे काम ठप्प आहे. मध्यंतरी यासाठी नवीन निविदा काढण्यात आली. मात्र, अजूनही कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून महामार्गावर प्रवास करणारा प्रवासी चिपळुणात थांबतो. मात्र, स्थानकच नसल्याने त्यांना उन्हाळा व पावसाळ्यात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्याच पद्धतीने रत्नागिरी हे जिल्ह्यातील मुख्यालय असताना तेथील बसस्थानकाची इमारत पाडण्यात आली आहे. केवळ खोदकाम केले आहे. लांजा येथील बसस्थानकाचीही तीच अवस्था आहे. जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनात एसटीला महत्त्व आहे. ग्रामीण भागातील लोक एसटीनेच तालुक्याला येत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांसाठी एसटी महत्त्वपूर्ण आहे. परंतु लांजा, रत्नागिरी व चिपळूण येथील बसस्थानकाची इमारतच नसल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची परवड होत आहे. याची परिवहन खात्याने तत्काळ दखल घ्यावी. विशेषकरून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अॅड. अनिल परब हे परिवहन मंत्रीदेखील आहेत. त्यामुळे त्यांनी पालकत्त्व घेतलेल्या जिल्ह्यातच तीन बसस्थानकांची इमारत अजूनही मार्गी लागलेली नाही. याची तत्काळ दखल घ्यावी. अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल,असा इशारा अॅड. पेचकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:49 AM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here