विज्ञान प्रदर्शनामध्ये अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुल चे यश

0

रत्नागिरी : पी. एस. बने इंटरनैशनल स्कूल आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत रा. भा. शिर्के प्रशालेच्या गुरुकुलची इ. आठवी मधील विद्यार्थिनी कु. वेदिका नथुराम पाचकले हिने तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले. पी. एस. बने इंटरनैशनल स्कूल साडवली या शाळेने विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्या सर्व स्पर्धकांमधून कु. वेदिका नथुराम पाचकले हिने सादर केलेल्या बैटरी वर चालणारे औषध फवारणी व गाडी धुणी यंत्राला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या प्रसंगी पी. एस. बने इंटरनैशनल स्कूल मार्फत प्राप्त प्रशस्तीपत्रक, ब्रॉन्झ मेडल व रोख रक्कम देऊन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गुळवणी मैडम यांच्या हस्ते व उपमुख्याध्यापक श्री चव्हाण सर, पर्यवेक्षक श्री. कांबळे सर, गुरुकुल विभाग प्रमुख श्री. सनगरे सर यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. कु. वेदिका तिचे आईवडील व मार्गदर्शक शिक्षक यांचे र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:30 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here