चिपळुणात २९ हजारांचा गुटखा जप्त

0

चिपळूण : शहरात २९ हजार किंमतीचा गुटख्याचा साठा करून ठेवणाऱ्या एका विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून संशयित व्यापाऱ्याला अटक केली आहे. सुरेश गुरुलिंग जंगम (४१, पिंपळी खुर्द) असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद विजय जयसिंग पाचपुते (३६, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, रत्नागिरी) यांनी दिली आहे. या धाडीत विमल पान मसाला, आरएमडी पानमसाला, व्ही-१ टोबॅको, रॉयल ७१७ तंबाखूचे पुडे असा एकूण २८ हजार ९१० रुपयाचा मुद्देमाल अधिकाऱ्यांनी जप्त केला. जंगम याला न्यायालयात हजर केले असता, शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:39 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here