एमपीएससी आंदोलन: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल

0

पुणे : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी पुण्यातील शास्त्री रस्त्यावर केलेल्या अघोषित आंदोलनाचे नेते बनलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर देखील पडळकर यांनी आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून पडळकर, विक्रांत पाटील, पुनीत जोशी, प्रदीप देसरडा, लक्षण हाके, अभिजित राऊत, संतोष कांबळे, धीरज घाटे यांच्यासह नऊ जणांना रात्री ताब्यात घेतले होते. याप्रकरणात पडळकर यांच्यासह एकूण वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:04 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here