चिपळूणच्या ग्रंथोत्सवाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

0

रत्नागिरी : चिपळूणमध्ये आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाला प्रतिसाद मिळाल्याने ग्रंथोत्सवाची मुदत येत्या १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. चिपळूणमधील परकार कॉम्प्लेक्सशेजारील द बुक लॅण्ड दालनात ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांच्या आग्रहास्तव १५ मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रदर्शनात समाजातील विविध संस्थांच्या घडामोडींवर भाष्य करणारी नामवंत लेखकांची सकाळ प्रकाशनाची पुस्तके मांडली आहेत. ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण वाचनाचा आनंद ही पुस्तके देतात. या ग्रंथप्रदर्शनात शेती, अध्यात्म, तत्त्वज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, माहितीपर, अर्थविषयक, पालकत्व, स्पर्धा परीक्षा, वैचारि, ललित अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे.पुस्तक खरेदीवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय १२०० रुपये आणि त्यापुढील पुस्तक खरेदीवर वाचक, वाचनालये आणि अन्य संस्थांसाठी ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:09 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here