रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा आज बंद

0

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाकडून साळवी स्टॉप येथील जलशद्धीकरण केंद्रापर्यंत येणारी मुख्य जलवाहिनी १० ते १२ ठिकाणी फुटली आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे. शीळ धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनी गेल्या काही दिवसांमध्ये १० ते १२ ठिकाणी फुटली आहे. तात्पुरती उपाययोजना करून पाणीपरवठा चाल ठेवण्यात आला होता. परंतु, जलवाहिनीच्या गळतीमुळे जलशुद्धीकरण केंद्राजवळील साठवण टाक्या अपेक्षित पातळीपर्यंत भरत नव्हत्या. त्यामुळे पाणीपुरवठा कमी वेळ आणि कमी दाबाने होत होता. सणासुदीचे दिवस असल्याने ताप्तुरत्या स्वरूपात गळती रोखून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, पुढे अशाच तात्पुरत्या उपाययोजनेने पाणीपुरवठा सुरू ठेवणे धोकादायक बनले. यातून मोठी समस्या निर्माण होऊ नये आणि अचानक पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती सोमवारी करून घेतली जाणार आहे. त्यामुळे सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here