”राज्यातील जनतेसाठी महाविकासआघाडी हा एक त्रास”

0

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. MPSC परीक्षेच्या नवीन तारखेवरुन भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले आहे. राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे,” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. “हॉलतिकीट कशाला काढली. विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन ढासळलं आहे. त्यांचं नुकसान झालं तर ते सरकार भरून देणार का? राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. “विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. जेव्हा भ्रष्टाचार करायचा असतो. टेंडर पास करायचे असते, तेव्हा सरकारमधील लोकांचा ताळमेळ चांगला असतो, राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे,” अशी टीकाही नितेश राणेंनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:37 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here