“हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?”, एमपीएससी प्रकरणावरून राज्य सरकारवर घणाघात

0

मुंबई : राज्यातील एमपीएससीच्या परीक्षेवरून काल मोठा गोंधळ निर्माण झाला होता. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तर या निर्णयाविरोधात परीक्षार्थिंनी मोठे आंदोलन उभारल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना पुढाकार घेऊन परीक्षेबाबत निर्णय जाहीर करावा लागला. अखेर आज एमपीएससीची परीक्षा ही २१ मार्चला घेण्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, एमपीएससी परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळावरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी? असा घणाघाती सवाल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे, असे मंत्री वडेट्टीवार म्हणतात. याचा अर्थ राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत एवढं हे दुबळं सरकार आहे असाच होतो, हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?, असं त्यांनी म्हटलं आहे  

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:22 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here