राज्य सरकारने वीज ग्राहकांचा विश्वासघात केला : राजू शेट्टी

0

कराड : राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. लॉकडाऊनच्या काळातील एप्रिल, मे, जून महिन्याचे बील माफ करावे म्हणून आम्ही सातत्याने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे झाले, वीज बिल जाळून झाली, महावितरण कार्यालयाला कुलुपे लावली. सरकारने सुरवातीला सकारत्मक प्रतिसाद दिला. ऊर्जामंत्र्यांनी गोड बातमी देतो म्हणून सांगितले. सरकारने जाहीर केले होते, आम्ही आता वीज बिल माफी केली जाईल. विरोधी पक्षांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर वीजतोडणीच्या आदेशाला पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली. मात्र निर्णय होण्याआधीच आठ दिवसांत स्थगिती उठवून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here