चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाबाबत शासनस्तरावर हालचाली नाहीत : संजय गुप्ता

0

रत्नागिरी : चिपळूण-कऱ्हाड नियोजित रेल्वेमार्गाबाबत शासन स्तरावर अजून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. गुप्ता रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले की, कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवरच्या गाड्या सुरू होतील. डिझेलवर धावणाऱ्या इंजिनच्या धुरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच इंधन खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणही सुरू आहे. काही दिवसांपूर्वी खेडदरम्यानच्या मार्गावर रो-रोमधून ट्रक कोसळला होता. हा अपघात ट्रक रोरो वर व्यवस्थित लोडिंग न झाल्यामुळे घडल्याचे चौकशीतून समोर आल्याचे. गुप्ता म्हणाले. त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या काळात कोकण रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक पॅसेंजर गाड्या आजही बंद आहेत. त्या सुरू होण्यासाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळणे अपेक्षित असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.यावेळी विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेड्ये, जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, सचिन देसाई आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:30 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here