जिल्हास्तरीय तायक्वानदो स्पर्धेत स्वरा साखळकर हिचा सुवर्ण पदकाचा डबल धमाका

0

रत्नागिरी : 14 वी रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज क्युरोगी आणि 8 वी पुमसे तायक्वानंदो चॅम्पियनशिप 2021 अंतर्गत रत्नागिरी तायक्वानदो स्पोर्ट असोसिएशन आणि साई तायक्वानदो स्पोर्ट्स खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड येथे आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा 11 मार्च 14 मार्च या कालावधित डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान खेड येथे खेळवली जात आहे. या स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वानदो ट्रेनींग सेंटर रत्नागिरी ची खेळाडू कुमारी स्वरा विकास साखळकर हिने क्युरोगी प्रकारात एक सुवर्ण आणि पुमसे प्रकारात एक सुवर्ण पदकाची कमाई करून धमाका उडवला. क्युरोगी प्रकारात अटीतटीच्या झालेल्या तिनही सामन्यात स्वरा साखळकर हिने आपले वर्चस्व सिद्ध केले. स्वरा साखळकर ही शिर्के शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता 2 री च्या वर्गात शिकत आहे. स्वराच्या आजच्या यशात तिने घेतलेली अथक मेहनत आणि प्रशिक्षक श्री राम सर, गौरव सर, तेजस सर सोनम मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले स्वरा ने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन होतं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक आणि खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब यांच्या हस्ते स्वरा साखळकर हीला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:33 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here