ऑनलाइन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत देवरूखच्या साक्षी वरक ने पटकावला प्रथम क्रमांक

0

रत्नागिरी : शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाकडून आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत साक्षी बाब्या वरक ही देवरूखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. गेल्या महिन्यात ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत साक्षी सुभाष धनावडे (माध्यमिक विद्यालय, करबुडे, लाजूळ, ता.रत्नागिरी) दुसरी, तर मनस्वी दिलीप पवार (वेळवी पंचक्रोशी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वेळवी, ता. दापोली) आणि इशिका चंद्रकांत कांबळे (तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा) या दोघींनी तिसरा क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ विजेते विद्यार्थी असे – तीर्था संदीप मांजरेकर (साने गुरुजी विद्यामंदिर, जानशी, ता. राजापुर), तनुजा संतोष भालेकर (माध्यमिक विद्यालय, करजुवे, ता. संगमेश्वर), आंचल ज्ञानेंद्र मिश्रा (सह्याद्री शिक्षण संस्थेचे इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे, ता.चिपळूण), रिया अनिल सुर्वे (डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, पाली, ता. रत्नागिरी), आशीष अनिल गजमल (रामवरदायिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, निरबाडे, ता. चिपळूण). स्पर्धेचे परीक्षण संदेश रहाटे यांनी केले.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, सचिव गणपती एडवी, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योत्स्ना ठाकूर यांनी अभिनंदन केले. स्पर्धाप्रमुख म्हणून विनायक हातखंबकर यांनी काम पाहिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:40 PM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here