छत्रपती शिवाजी स्टेडीयम मधील गाळेधारकांनी घेतली न्यायालयात धाव

0

🔳 गाळेधारकांची न्यायालयात जाण्याची शक्यता ओळखूनच रनपचे वकील अ‍ॅड. निलांजन नाचणकर यांनी केले कॅव्हेट दाखल

रत्नागिरी : शहरातील मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील ११ गाळे पाच दिवसात ताब्यात देण्याची नोटीस नगर परिषदेने बजावली. ही नोटीस मिळाल्यानंतर त्या नोटीसला स्थगिती मिळवण्यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कॅव्हेट दाखल केलेले असल्याने रनपच्या वकीलांना येत्या सोमवारी (ता.१५) बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. मुदत संपलेले हे गाळे ताब्यात घेण्यासाठी मालमत्ता विभाग या ठिकाणी गेले असता सोबत पोलीस बंदोबस्त नसल्याने गाळेधारकांनी या पथकाला दाद दिली नाही. त्यानंतर ९ मार्च रोजी गाळेधारकांना नोटीस देवून गाळे पाच दिवसात ताब्यात देण्याची समज देण्यात आली. गाळे ताब्यात न दिल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती, औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला. सर्वांना नोटीस मिळाल्यानंतर गाळेधारक नोटीसच्या कार्यवाहिला स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात जाण्याची शक्यता ओळखून रनपचे वकील अ‍ॅड. निलांजन नाचणकर यांच्या मार्फत कॅव्हेट दाखल करण्यात आले. रनपची बाजू ऐकून घेण्यासाठी दाखल केलेल्या कॅव्हेटनुसार न्यायालयाने रनपला येत्या सोमवारी बाजू मांडण्यास सांगितले आहे. गाळेधारकांना दिलेल्या नोटीसला स्थगिती मिळू नये यासंदर्भात अ‍ॅड. निलांजन नाचणकर लेखी म्हणणे देवून त्यासंदर्भात युक्तीवाद करणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:13 PM 12/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here