नीट परीक्षेची तारीख जाहीर

0

मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात एकाच वेळेस घेतल्या जाणाऱ्या नीट -२०२१ च्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नीट-२०२१ परीक्षा ऑफलाईन होणार आहे. १ ऑगस्ट २०२१ रोजी रविवारी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

MBBSआणि BDS तसेच तत्सम वैद्यकीय विषयातील शिक्षणासाठी ही परीक्षा घेतली जाते. MBBSआणि BDSला NEET EXAM मधील गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो. यावरुन देशभरातील सरकारी तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यावर्षी NEET EXAM 2021 कधी होईल यावर प्रश्न चिन्ह लागलं होतं. मागील वर्षी २०२० मध्ये ही परिक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी झाली होती. या वर्षी ही परिक्षा मागील वर्षापेक्षा १३ दिवस आधी होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने NEET EXAM 2021 परिक्षेची तारीख जाहीर केली आहे. National resting agency ने ही तारीख जाहीर केली आहे. ११ क्षेत्रीय भाषांमध्ये ही परिक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑफलाईनच म्हणजे कागद आणि पेननेच घेतली जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:13 AM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here