मिताली राज ने ओलांडला 10 हजार धावांचा टप्पा

0

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. दहा हजार धावा करणारी मिताली राज ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. जागतिक पातळीवर 10 हजार धावा करणारी मिताली ही दुसरी खेळाडू आहे. यापूर्वी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्स हिने 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, 10 हजार 273 धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. पण मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा विक्रम मितालीच्या नावे नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे. यासोबतच मितालीच्या नावे अजून एक विक्रम प्रस्थापित आहे. क्रिकेटच्या इतिहासात मिताली सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच 200 हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे. त्याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6 हजार 938 धावांचा विक्रम तिच्या नावावर आहे. तसेच, सर्वाधिक सलग 111 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा देखील विक्रम तिच्याच नावावर आहे. मिताली राजने 1999 साली आयर्लंड विरोधातील सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या 22 वर्षांपासून देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यामितालीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 310 सामन्यात 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये 10 कसोटी आणि 211 एकदिवसीय आणि 82 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. मितालीने 10 हजार धावा पूर्ण केल्यानंतर बीसीसीआयने ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here