रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार?; रायगड आणि रत्नागिरीत दोन जागांची पाहणी

0

मुंबई : रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही, पण त्या प्रकल्पाला रिफायनरी प्रकल्प होणार, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प नाणार ऐवजी इतरत्र होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने या प्रकल्पासाठी रायगड आणि रत्नागिरीत दोन जागांची पाहणी केली असून त्याचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे हा रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रायगड तालुक्यातील तळा आणि रत्नागिरी तालुक्यातील जयगड या त्या दोन जागा आहे. दोन्ही जागा 9 हजार एकरच्या असून या दोन्ही जागांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यता येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तीन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसाठी नव्या दोन जागांचा पर्याय निर्माण करण्यात आला असून त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here