जुगार अड्डयावर धाड; सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त

0

चिपळूण : शहरातील राधाकृष्णनगर येथे एका सदनिकेमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चिपळूण पोलिसांनी शनिवारी (दि. 5) सायंकाळी धाड टाकली. यामध्ये 2 लाख 19 हजार 831 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सायंकाळी 7 वाजता ही कारवाई करण्यात आली. मुत्तपन मंदिराशेजारी बेबी गोपाळ राठोड यांच्या सदनिकेत पैसे लावून पत्त्याचा खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, समद बेग, इमरान शेख, महेश जाधव, मनोज कुळ्ये, वैभव शिवलकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घराच्या मजल्यावर बंद खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे दहाजण जुगार खेळत असल्याचे आढळले. यामध्ये 10,031 रुपये रोख, दहा हजार किमतीचे सहा मोबाईल, 9200 रुपयांचे टेबल, खुर्च्या, 1 लाख 90 हजार रुपये किमतीच्या दोन रिक्षा असा 2 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी संदीप श्रीराम साळवी, सचिन रघुनाथ कमलाकर, सुभाष रामचंद्र खांबे, मुन्वर रजामियाँ जमादार, परिमल कमलाकर वाडकर, लक्ष्मण रत्नू शिगवण, विकी अशोक गोरिवले, समीर रघुनाथ कमलाकर,  संदेश अशोक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबत अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत. शहरात सुरू असलेल्या जुगार, मटका अड्ड्यांवर पोलिसांनी सातत्याने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here