गौतम अदानी यांनी या वर्षी कमावली सर्वाधिक संपत्ती

0

नवी दिल्ली : गेल्या वर्षी जगभरात कोरोनामुळे मंदी असतानाही भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत भरघोस वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. या वर्षी भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून एकाच वर्षात सर्वाधिक प्रमाणात संपत्तीमध्ये वाढ झालेल्या अब्जाधिशांच्या यादीत गौतम अदानी यांनी टेस्लाच्या इलॉन मस्क आणि अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांनाही मागे टाकलं आहे. Bloomberg Billionaires Index च्या अहवालानुसार अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत 16.2 बिलियन डॉलर्सवरुन वाढ होऊन ती 50 बिलियन डॉलर्सवर पोहचली आहे. अदानी यांच्या उद्योगाच्या शेअर्समध्ये या वर्षी तब्बल 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षापासून अदानी हे जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्या उद्योगाचा यशस्वी विस्तार करताना दिसत आहे.
अदानी यांनी संपत्ती वाढीच्या प्रमाणाच्या बाबतीत मुकेश अंबानी यांनाही मागे टाकलं आहे. अदानी यांच्या संपत्तीत या वर्षी जवळपास 1620 कोटी डॉलर्स इतकी वाढ झाली असून मुकेश अंबानींच्या संपत्तीत 810 कोटी डॉलर्सची वाढ झाली आहे. असं असलं तरी संपत्तीच्या बाबतील अदानी हे मुकेश अंबानींच्या खूप मागे आहेत. अदानी यांची संपत्ती पाच हजार कोटी इतकी आहे तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 8480 कोटी इतकी आहे. मुकेश अंबानी जागतिक अब्जाधिशांच्या यादीत दहाव्या स्थानी आहेत तर गौतम अदानी हे 26 व्या स्थानी आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here