८२ टक्के नागरिक म्हणतात शहरात हेल्मेटसक्ती अयोग्य

0

◼️ रत्नागिरी खबरदारच्या जनमत चाचणीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

◼️ डोक्याच्या वजनाला आता हेल्मेटचा भार, अनेकांना जडला मणक्याचा आजार

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात दुचाकीचालकांना हेल्मेट वापरण्यास सक्ती करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच हि सक्ती करण्यात येत आहे. मात्र रत्नागिरी शहरासारख्या छोट्या शहरात जिथे रस्त्यांची दुरवस्था व गर्दीची ठिकाणे आहेत तेथे हेल्मेट वापरणे, सांभाळणे अनेकांना अडचणीचे ठरत असल्याचा सूर जनतेतून उमटू लागला होता. त्यातच दिवसेंदिवस वातावरणातील वाढत जाणारा उष्मा देखील शहरातून हेल्मेट घालून प्रवास करताना प्रचंड त्रासदायक ठरत होता. हेल्मेट सक्तीमुळे शहरातील व्यापारावर देखील प्रचंड परिणाम झाला असल्याचे मत व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही लागू नसणारी हेल्मेट सक्ती फक्त शहरातच का ? असा सवाल देखील नागरीकातून विचारला जात होता. म्हणूनच रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून एक जनमत चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ८,८१५ जणांनी आपले मत नोंदवले. रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती आवश्यक आहे कि नाही असा प्रश्न यात विचारण्यात आला होतं. याबाबत आपले मत नोंदवताना ८२ टक्के नागरिकांनी शहरात हेल्मेटसक्ती अयोग्य तर १८ टक्के नागरिकांनी सक्ती आवश्यक असल्याचे मत नोंदवले आहे. मुळात डोक्याच्या वजनावर हेल्मेटचा पडणारा अतिरिक्त भार, शहरातील खड्डेमय रस्ते यामुळे अनेक दुचाकीचालकांना मणक्याचा त्रास सुरु झाला असल्याचे बोलले जात आहे. अनेक मोठ्या शहरातून हेल्मेट सक्तीला मोठा विरोध झाल्यावर हि सक्ती मागे घेण्यात आली. अशा पद्धतीने लोकांनी रस्त्यावर उतरायलाच पाहिजे काय ? असा प्रश्न नागरिकांनी आता उपस्थित केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:18 AM 13/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here