🔳 रत्नागिरी खबरदारच्या वृत्ताची तातडीने घेतली दखल
➡ रत्नागिरी : शाळा दुरुस्तीच्या कामासाठी रात्री वस्तीची एसटी बस नेणाऱ्या चालक, वाहकांची गैरसोय झाल्याने तसेच चालक, वाहक ज्या खोलीत वस्ती करतात त्या खोलीत शाळेचे सामान ठेवण्यात आल्याने नांदिवडेत जाणाऱ्या सर्व एसटीच्या फेऱ्या रद्द करण्याचा तुघलकी निर्णय एसटी प्रशासनाने घेतला होता. बससेवा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील सरपंच आर्या गडदे यांनी दिला होता. याबाबतचे वृत्त काही वेळापूर्वी रत्नागिरी खबरदार मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. एसटी अधिकाऱ्यांशी याबाबत तातडीने संपर्क साधून हि बस सेवा आजपासून पूर्ववत चालू करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:30 AM 13/Mar/2021
