ममता बॅनर्जी यांना डिस्चार्ज, व्हीलचेअरवरून प्रचार करणार

0

कोलकाता : नंदीग्राम येथील हल्ल्यात पायाला दुखापत झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी शुक्रवारी दिली. ममता बॅनर्जी यांच्यावर कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते. ममता यांची गुरुवारी प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या रक्तातील सोडिअमचे प्रमाण कमी झाले होते. मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती आणखी सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. नंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रसंगी व्हीलचेअरवरून प्रचार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:39 AM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here