दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने अपघात; दोघे जखमी

0

रत्नागिरी : दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने अचानकपणे ब्रेक लावल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. यात दुचाकी (एमएच-०८-एबी-६१२५) वरील दोघे जखमी झाले असून ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वा.सुमारास जे. के. फाईल्स बसस्टॉप पुढे घडली. ऋषिकेश राजेंद्र पवार (३५, रा. हुनमाननगर, मिरजोळे रत्नागिरी) आणि त्याची आई या अपघातात जखमी झाले. अपघातानंतर दोघांनाही तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक नितीन जाधव करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here