मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून सीईओंनी केला अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा

0

रत्नागिरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपली कन्या कु. याना हिच्या नावे सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडून अनोख्या पध्दतीने जागतिक महिला दिन साजरा केला. डॉ. इंदुराणी जाखड यांनी कन्या यानासह प्रत्यक्ष प्रधान डाकघर येथे जाऊन सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडून घेतले. या प्रसंगी डॉ. इंदुराणी जाखड यांचे सासरे व डॉ. मोहितकुमार गर्ग यांचे वडील बुध राम गर्ग व सासु श्रीमती पुष्पादेवी यांनी आपली नात कु. याना हिच्या सुकन्या समृध्दी योजनेच्या खात्यात एक लक्ष रुपये भरणा केले. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सुकन्या समृद्धी योजनेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने याना हिचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले असल्याचे डॉ. जाखड यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रधान डाकघर रत्नागिरीचे पोस्टमास्तर चंद्रकांत दाभीळकर, उपडाकपाल अमिना कदम, जयंत खरे व जनसंपर्क अधिकारी सचिन तोडणकर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here