डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका; कर्नाटकच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार : संजय राऊत

0

मुंबई : बेळगावात मराठी माणासांवर सुरु असलेल्या दडपशाहीविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. बेळगावात मराठी नागरिकांवर, शिवसेनेच्या कार्यालवर हल्ले होत आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असे म्हणत पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here