एलईडी लाईट, बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी विरोधात मालवणात मच्छीमारांचे उपोषण आंदोलन

0

मालवण : परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारी मुळे त्रस्त असलेल्या पारंपरिक मच्छिमारांनी शुक्रवारी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले. दरम्यान, मत्स्य विभागाची कारवाई सुरू आहे. मात्र समुद्रात 12 नॉटिकल बाहेर क्षेत्र हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्या ठिकाणी सुरू असलेली मासेमारी आपण रोखू शकत नाही ते अधिकार आपल्याला नाही. असे सहायक मत्स्य व्यावसाय आयुक्त नागनाथ भादुले यांनी स्पष्ट केले. तसेच जे कायद्यात आहे ते करणार असेही भादुले यांनी स्पष्ट केले. मालवणसह सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मच्छिमार प्रतिनिधींनी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग सहाय्यक मस्य आयुक्त कार्यालय, मालवण येथे बेमुदत साखळी उपोषण छेडले. या उपोषण पार्श्वभूमीवर शुक्रवारी मासे विक्री आणि खरेदी बंद ठेवण्यात आली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:22 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here