रत्नागिरीच्या ‘वैष्णवी’ची वजीर सुळक्यावर चढाई

0

रत्नागिरी : येथील खडपेवठार भागातील १९ वर्षांची वैष्णवी दयाराम श्रीनाथ हिने सह्याद्रीच्या खोऱ्यातील सर्वांत कठीण श्रेणीत गणलेला वजीर सुळका सर करत ‘लेक वाचवा लेक जगवा’ हा संदेश दिला. निसरडी गवताळ पाऊलवाट, अतिकठीण चढाई, सुळक्याच्या पूर्वेकडील सुमारे ६०० फूट खोलीचा उतार, चढाई करताना पाय निसटला तर दरीच्या जबड्यातच विश्रांती मिळण्याची शक्यता अशा स्थितीत तिने चढाई केली. वैष्णवी रत्नागिरीच्या वि. स. गांगण कला व वाणिज्य ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. या मोहिमेचे संयोजन रत्नागिरीतील माऊंटेनिअर्स असोसिएशनचे सेक्रेटरी राजेश नेने व सदस्य आकाश पालकर (आडी) आणि त्यांच्या टीमने केले. मोहिमेदरम्यान लागणारे तांत्रिक सहकार्य नाशिक येथील पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचरचे संचालक जॉकी साळुंखे व टीमने दिला. समाजसेविका माई सावर्डेकर यांच्या हस्ते तिचा सन्मान करून या मोहिमेची सांगता करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:45 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here