रत्नागिरीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या

0

रत्नागिरी : शहरातील सन्मित्रनगर येथे  एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. प्रसाद दिलीप कुलकर्णी (वय 29, रा. अनमोल प्राईड, सन्मित्रनगर, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी प्रसादचे कुटुंबीय लांजा येथे गेले होते. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रसादचे कुटुंबीय घरी परतले. तेव्हा त्यांना सदनिकेचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी प्रसादला हाक मारली. परंतु, बराचवेळ झाला तरी प्रसादने कोणताही प्रतिसाद न दिल्याने तसेच दरवाजा न उघडल्याने त्यांनी शेजार्‍यांच्या मदतीने दरवाजा उघडला तेव्हा त्यांना प्रसाद नायलॉन दोरीने फॅनच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने घाबरलेल्या कुटुंबीयांनी प्रसादला तशाच अवस्थेत तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. प्रसादच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. 

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here