गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

0

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी कार्यालयामार्फत शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटखा/पानमसाला इत्यादी प्रतिबंधित पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईचे धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ४ रोजी रत्नागिरी शहरातील सुनिल दत्तात्रय लिंगायत मे. लिंगायत पान शॉप साळवी स्टॉप रत्नागिरी, प्रमोद रामचंद्र कळंबटे मे. कळंबटे पान शॉप साळवी स्टॉप, रत्नागिरी, अब्दुला यारमोहम्मद खान मजगाव रोड रत्नागिरी, विश्वास दिनकर गांधी मे. रसदा पान शॉप मारुती मंदिर रत्नागिरी, शिवराम सीताराम टिळेकर मे. महाराष्ट्र पान शॉप, मारुती मंदिर, रत्नागिरी, अजय अविनाश घडशी मे. महादेव पान सम्राट आठवडा बाजार रत्नागिरी, प्रितम उदय कदम मे. प्रितम उदय कदम मजगाव रोड रत्नागिरी यांचेकडून एकूण ३४ हजार ४५७ रुपये किमतीचा गुटखा/पानमसाला इत्यादीचा साठा जप्त करून सदरी सातही पेढीस सील करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई सहायक आयुक्त(अन्न) रत्नागिरी संजय नारागुडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ कांबळे, प्रशांत गुंजाळ, विजय पाचपुते यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:46 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here