‘दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी सापडत नाहीत म्हणजे काय?’ हायकोर्टाने तपास यंत्रणांना फटकारले

0

मुंबई : अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासातील रखडपट्टीवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी अजून सापडत नाहीत म्हणजे काय? तपास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आणखी किती वेळ लागणार आहे? असा प्रश्नांचा भडिमार करीत न्यायालयाने सीबीआय आणि सीआयडीला फटकारले. दाभोळकर आणि पानसरे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी झाली. दाभोलकरांची 2013 मध्ये, तर पानसरेंची 2015 मध्ये हत्या झाली. आता वर्ष 2021 चालू आहे. अजून तपास रेंगाळला आहे. दोन्ही हत्याकांडांच्या तपासाची ही रखडपट्टी आणखी किती वेळ चालणार आहे, असा खडा सवाल न्यायालयाने तपास यंत्रणांना केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:35 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here