नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत एकतर्फी निर्णय घेतात; राष्ट्रवादीची टीका

0

नागपूर : राज्यात ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे. नागपुरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. ‘लॉकडाऊन लावताना लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतले नाही. लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली असती तर अनेक पर्याय पुढं आले असते. ज्या प्रमाणे पुण्यात अजित पवार यांनी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन योग्य निर्णय घेतला. त्याचप्रमाणे नागपुरात अपेक्षित होते. मात्र, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे एकतर्फी निर्णय घेतात’, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:50 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here