मुंबई : राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे. तो राज्याचा नसून फक्त पुणे केंद्रीत अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी शुक्रवारी (12 मार्च) पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या अर्थसंकल्पातील अनेक गोष्टींवर आपली भूमिका मांडली. नारायण राणे म्हणाले की, अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढवून दाखवले आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. ठाराविक ठिकाणी सरकारने खर्च केला आहे. पुणे शहराच्या रस्त्यांसाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबईतील सागरी मार्गासाठी काहीच दिले नाही. अर्थसंकल्पामध्ये 1 लाख कोटींची तूट आहे. त्यामुळे ती कशी भरुन काढणार, याबाबत सरकारने काही स्पष्ट केलेलं नाही. अधिवेशनात अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी वाचून दाखवली, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या टीव्हीवर सुरू असलेल्या जाहिराती ही निव्वळ धूळफेक आहे. या जाहिराती बघून लोक ठाकरे सरकारला शिव्या घालत आहेत. कोकणातील चक्रीवादळाच्या समस्येवर एक रूपयाही आला नाही, असं नारायण राणे यांनी सांगितलं.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:58 PM 13-Mar-21
