कोसुंबची कन्या राध्वी जाधव हिचा मुंबई पोलिस आयुक्तांच्या हस्ते गौरव

0

साडवली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्याहस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस कुटुंबातील महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कोसुंब गावातील रहिवासी शशिकांत जाधव व सौ. भारती जाधव यांची नात राध्वी जाधव (वय १२ वर्षे) हिचाही गौरव करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. राध्वी हिने बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिकस संघटना स्पर्धा २०१९-२०२० मध्ये कांस्य पदक पटकावले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:58 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here