”तीळगूळ वाटल्यासारखी लस देवू नये”

0

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईतल्या लसीकरण केंद्रांना भेट देवून पाहणी केली. सुरूवातीला त्यांनी कस्तुरबा रूग्णालयात जावून तिथं सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी सायन, नायर आणि केईएम रूग्णालयात जावूनही तेथील लसीकरणाचा आढावा घेतला. पाहाणी झाल्यानंतर त्यांनी मध्यमांसोबत संवाद साधला. शिवाय कोरोना रूग्णांचा संख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊन करावा लागेल असं देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्यापालिका रूग्णालयांमध्येही उद्यापासून कोव्हॅक्सिन लस दिले जाणार. २४ तास लसीकरण सुरू करण्याची तयारी करतोय. मास्क न वापरणा-यांवर कारवाई करून ४० कोटी रूपये दंड वसूल करण्यात आलाय. जेजे सारखी घटना मुंबई महापालिका रूग्णालयात समोर आलेले नाही. नियमनुसारच लस द्यायला हवी. तीळगूळ वाटल्यासारखी लस देवू नये, असं त्यांनी म्हटलं आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here