घराच्या गॅलरीतून पडल्याने जखमी तरुणाचा मृत्यू

0

रत्नागिरी : तालुक्यातील आंबोळगड येथे घराच्या गॅलरीतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वा. सुमारास घडली. अमित आत्माराम बंडबे (२६, मूळ रा. लांजा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमित हा गेल्या काही महिन्यांपासून आंबोळगड येथे वास्तव्यास होता. रविवारी सकाळी ७ वा. सुमारास घराच्या गॅलरीतून पडून गंभीर जखमी झाला होता. जिल्हा शाकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here