शिलेदारांकडून रायगड टकमक टोक मोहीम फत्ते

0

सिंधुदुर्ग : भूमी आणि आकाश यांच्यातील पोकळी चिरुन पुढे घुसलेली टकमक टोकाची सोंड हे रायगड चे एक भयाण असे रौद्रारुप काळजाचा ठोका चुकवणारे आहे. महाराज्यांच्या काळात जेव्हा रायरी चा रायगड करायला सुरुवात झाली तेव्हा याच टकमक टोकावरुन गुन्हेगारांना कडेलोटची शिक्षा दिली जात असे. रायगडवरिल या रौद्रभिषन टकमक टोकावरुन दिनांक 8 मार्च 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरवडे, भैरगडाचे मानकरी दिगवळे गावचे सुपुत्र शैलेश जाधव यांनी यशस्वीपणे अवरोहन केले. तत्पूर्वी एक दिवस अगोदर शैलेश यानी रायगड चा हिरकणी कडा आरोहण केले. शैलेश हा मुंबई मधील शिलेदार एडव्हेचंर इंडिया या गिर्यारोहण संस्थेचा मुख्य सदस्य आहे, नेहमीच तो अनोख्या मोहिमांमध्ये आवडीने सहभाग घेत असतो. शिलेदार संस्थेचे संस्थापक शिलेदार सागरदादा नलवडे याच्यां मार्गदर्शनाखाली ही अनोखी मोहीम राबविण्यात आली होती. ते जेव्हा पाठीशी असतात तेव्हा कोणतीही मोहीम अशक्य वाटत नाही. मोहीमेसाठी सदस्य प्रदीप मदने, स्वप्निल कदम तसेच रायगडचे रहिवाशी असणारे विशाल खाबें, राजु शिदें याचें मोलाचे सहकार्य लाभले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:27 PM 13-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here