खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

0

लांजा : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस लांजा तालुका शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने सोमवार, दि. १५ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. १५ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत लांजा पंचायत समितीच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी लांजा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे. तसेच महिलाश्रम लांजा येथील मुलांना खाऊ व शै. साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यशिवाय तालक्यातील प्रत्येक पं.स.गणात सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर व लांजा शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी यांनी केले आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here