सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी

0

मुंबई : मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडलेली स्कॉर्पिओ जीप आणि त्यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना ‘एनआयए’ विशेष न्यायालयाने रविवारी (दि. १४) २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. तब्बल १३ तासांच्या कसून चौकशीनंतर एनआयए ने शनिवारी मध्यरात्री वाझे यांना अटक केली होती. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली जीप उभी करण्यात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयए ने केला आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here