दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत 5 हजार 880 जणांना कोरोना लसीकरण

0

रत्नागिरी : जिल्ह्यात 59 केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोना योध्यांनंतर प्रौढ, ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बीड रुग्णांना लस दिली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1 मार्च पासून आतापर्यंत 5 हजार 880 जणांनी लस घेतली.

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून फ्रंटलाईन कोरोना योध्द्यांना लसीकरणात सहभागी करून घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात 15 हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची यादी शासनाला सादर केली. या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही लस घेण्याचे आवाहन प्रशासनस्तरावरून करण्यात आले. आरोग्य यंत्रणेतील शासकीय, खासगी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय तसेच आरोग्य सेवक-सेविकांकडून प्रतिसाद कमी मिळाला. लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या 15,773 आरोग्य कर्मचार्‍यांपैकी 9 हजार 422 जणांनी लस घेतली. तसेच महसूल, पोलीसांपैकी 23 टक्के कर्मचारीच लसीकरणासाठी पुढे आले होते. महसूल कर्मचार्‍यांपैकी लसीकरणासाठी 1 हजार 20 जणांची तर पोलीसांपैकी 1 हजार 717 जणांची यादी होती. पुढील टप्प्यात प्रौढ, ज्येष्ठ नागरिकांसह कोमोर्बीड रुग्णांना लस दिली जात आहे. 1 मार्चपासून 45 ते 59 वयोगटातील लोकांसाठी लसीकरणात समावेश केला आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार 17 जणांना या लसीकरणाचा लाभ देण्यात आला. 60 वर्षे वरील ज्येष्ठांमध्ये एकूण 4 हजार 863 लोकांनी कोविड व्हॅक्सीनचा डोस घेतला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here