श्रीधर गायकवाड यांच्या ‘अथांग क्रिएशन आर्ट’चे ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

0

रत्नागिरी : नाचणे, विनम्र नगर येथील श्रीधर सुरेश गायकवाड यांच्या ‘अथांग क्रिएशन आर्ट’चे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते पार पडले. श्रीधर गायकवाड यांनी रत्नागिरी व परिसराचे पर्यटनात्मदृष्ट्या सुशोभिकरणासाठी काही कलाकृती तयार केल्या आहेत. नामदार उदय सामंत यांनी त्या मॉडेल्सची पाहणी केली व सविस्तर माहिती घेतली. त्यांनी श्रीधर गायकवाड यांच्या या उपक्रमांचे विशेष कौतुक केले व समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, माजी नगरसेवक सलिल डाफळे, नाचणे ग्रा.पं. सरपंच भैया भोंगले, प्रकाश रसाळ, संदीप सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:03 AM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here