रहाट तुटल्याने महिला कोसळली विहिरीत

0

लांजा : शहरातील सारस्वत वसाहत पात्रादेवीखिंड येथील सार्वजनिक विहिरीचा रहाट तुटल्याने पाणी भरत असलेली प्रौढ महिला ४० फूट खोल विहिरीत पडली. ही घटना रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. या दुर्घटनेनंतर नागरिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला दोरी आणि झुल्याच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. या घटनेत या महिलेला दुखापत झाली असून तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुगंधा गोविंद चव्हाण (५२) असे विहिरीत पडलेल्या महिलेचे नाव आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:10 AM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here