निवडणुक प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस

0

रत्नागिरी : गांधी जयंती या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील तब्बल २३८ कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. निवडणुकीसाठी नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी दोन ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. नवरात्रोत्सवामध्येच प्रशिक्षण असल्याने महिला कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. यावेळी व्हीव्हीपॅटसह ईव्हीएम मशिनचे प्रात्यशिकही देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला अनेक कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. निवडणूक विभागाकडून कारवाई करताना दापोली विधानसभा मतदारसंघातील १५, गुहागर १२, चिपळूणमधील २२, रत्नागिरीत १३१ आणि राजापूर येथील ५८ अनुपस्थित कर्मचाऱ्यांना शनिवारी नोटिसा बजावण्यात आल्या आहे. प्रशिक्षणासाठी ८५२७ कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विधानसभानिहाय वापरण्यात येणारे मनुष्यबळ पुढीलप्रमाणे आहे. दापोली १८२७, गुहागर १४८८, चिपळूण १५७३, रत्नागिरी १९४१ आणि राजापूर १६९८ कर्मचारी निवडणुकीचे काम करणार आहेत.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here