बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलीचा मृतदेह खाडीत सापडल्याने खळबळ

0

दापोली : दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ल्यातून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलीचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. नुसेबा सहीबोले आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले गेल्या १२ मार्च रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास आपल्याच मोहल्ल्यात सायकल फिरवीत होते. सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवायला घराकडे गेला. नुसेबा तेथेच उभी होती. मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला ती कोठेही आढळली नाही. म्हणून पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण ती सापडली नाही. पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पोलीसही त्या परिसरात तळ ठोकून होते. रविवारी नुसेबाचा मृतदेह खाडीत सापडला. त्यामुळे परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तिचा मृत्यू कशामुळे झाला आहे, याबद्दल पोलीस सखोल तपास करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here