“भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल”

0

नवी दिल्ली : त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण? अशी चर्चा उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यानंतर अनेक नावांचीही चर्चा सुरू होती. परंतु चर्चेत असलेल्या नावांना मागे टाकत तीरथ सिंह रावत यांच्या हाती उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. दरम्यान, उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी केली आहे. रविवारी ऋषिकुल येथील सरकारी पीजी आयुर्वेदीक महाविद्यालयात आयोजित ‘नेत्र कुंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.”आज अनेक देशांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी लाईनमध्ये उभे राहतात. यापूर्वीची स्थिती निराळी होती. जगातील कोणत्याच नेत्यांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांशी फरकच पडत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आता स्थिती बदलली आह. हा एक नवा भारत आहे जो त्यांनी निर्माण केला आहे,” असं रावत म्हणाले. त्यांच्या भाषणादरम्यान मोदी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. “यापूर्वीच्या काळात प्रभू श्रीराम यांनी समाजासाठी चांगलं काम केलं होतं आणि म्हणूनच लोकं त्यांना देव मानू लागले होते. याचप्रकारे भविष्यात आपल्या लाडक्या पंतप्रधानांसोबतही तसंच होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here