अपहार प्रकरणी बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यास जामीन

0

रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत खोटी बिले दाखल करुन अपहार केल्याप्रकरणी बांधकाम विभागातील कर्मचारी विठ्ठल नाचणकर आणि कुटुंबीयांना उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. रत्नागिरी येथील बांधकाम विभागातील कर्मचारी विठ्ठल नाचणकर तसेच त्याच्या नातेवाईकंविरोधात लाचलुचपत प्रतिबंध आत्म कायद्याअंतर्गत खोटी बिले दाखल करून शासनाच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. असे असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथील पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांनी विठ्ठल नाचणकरला त्याच्या जंगम मालमत्तेबाबतची माहिती देण्यास सांगितली होती. नोटीस पाठवूनही नाचणकर व त्याचे कुटुंबीय चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

HTML tutorialLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here