साई मंदिरातील दानपेटी चोरट्याने फोडली

0

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप-मानेवाडी येथे मोकळ्या जागेत बांधलेल्या साईमंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने १० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना शनिवारी (ता. १३) सकाळी आठच्या सुमारास निदर्शनास आली. सागर शशिकांत मोहिते (वय ३३, रा. गोळपमानेवाडी, रत्नागिरी) यांच्या स्वतःच्या मालकीच्या मानेवाडी येथे मोकळ्या जागेत बांधलेल्या साईमंदिरातील दानपेटी चोरट्याने उचलून नेऊन दगडाने कुलूप फोडून त्यामधील भाविकांनी दान केलेल्या सुमारे १० हजार रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी मोहिते यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल देऊसकर करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:24 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here