”राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले आमच्याकडेही येऊ शकतात”

0


राजकारणात काहीही होऊ शकतं. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले हेदेखील उद्या आमच्यासोबत येऊ शकतात, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. राज्यातील ठाकरे सरकार जावं यासाठीही आमचे प्रयत्न सुरू असल्याचं आठवले म्हणाले. सांगली येथे एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत नाना पटोले हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “राज्यातील ठाकरे सरकार लवकर जावं ही आमची इच्छा असून यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे सरकार पाच वर्षही टिकणार नाही हे खरं आहे,” असा दावा आठवले यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू नये ही आमची इच्छा आहे. परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सरकारडून प्रयत्न होणं आवश्यक आहे. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास राष्ट्रपती राजवटीबाबत विचार करावा लागणार असल्याचंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here