मंत्रिमंडळात होणार खांदेपालट? शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0

मुंबई, 15 मार्च : मुंबईत स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी सचिन वाझे अटकेचे आता महाविकास आघाडी सरकारमध्ये पडसाद उमटल्याचे पाहण्यास मिळाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची खाते बदलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीत राज्यातील परीस्थितीवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. विशेष करून सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला टिकेला सामोरं जावं लागतं आहे. या दृष्टीने चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.यावेळी मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काही मंत्र्यांच्या विभागांमध्ये बदल करायचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी संबंधित मंत्र्यांना खातेबदलाबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याचे पंख छाटले जाणार आणि कुणाची वर्णी लागणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here