जनशताब्दी एक्स्प्रेसला ‘विस्टा डोम’ कोच ऐवजी टू टायर कोच जोडणार

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला खास पर्यटकांसाठी जोडण्यात आलेल्या ‘विस्टा डोम’ कोच ऐवजी येत्या दि. २० ऑक्टोबरपर्यंत टू टायर श्रेणीचा डबा जोडण्यात येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईतील दादर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला (१२०५१/१२०५२) मध्य रेल्वेकडून विस्टाडोम हा पर्यटनपूरक कोच जोडण्यात आला आहे. काचेचे छत तसेच खिडक्यांना प्रशस्त काचा असलेला हा पारदर्शक डबा जोडण्यात आल्याने मुंबईतून गोव्याला सफर करणाऱ्या पर्यटकांचा या वातानुकूलित कोचमधून प्रवास करण्याकडे कल दिसून येतो. काही कारणाने रेल्वेच्या विस्टाडोम डब्याच्या जागी टू टायर वातानुकूलित श्रेणीचा डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल दि. २० ऑक्टोबरपर्यंत करण्यात आला आहे. रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार दादर-मडगाव मार्गावर धावताना सोमवार, गुरुवार तसेच शनिवारी तर मडगाव-दादर मार्गावर धावताना मंगळवार, शुक्रवार तसेच रविवारी जनशताब्दी एक्स्प्रेस विस्टाडोम कोचसह धावते. काही तांत्रिक कारणामुळे विस्टा डोम कोचऐवजी २० ऑक्टोबरपर्यंत टू टायर डब्यासह धावणार असल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी म्हटले आहे.

IMG-20220514-WA0009LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here