…म्हणून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेंची वकिली करत नव्हते ना?; नितेश राणेंचा गंभीर आरोप

0

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांच्यात झालेल्या संभाषणाची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली. वरुण सरदेसाईंसोबतच्या संबंधांमुळे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझे यांची वकिली करत नव्हते ना? असा सवाल विचारत नितेश राणेंनी थेट निशाणा साधला आहे. याशिवाय, मुंबईतील एका शिवसेना नेत्याचं टेलिग्राम चॅट आहेत. तेही तपासून घेण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

सचिन वाझे प्रकरणाचा आयपीएलच्या सट्टेबाजांशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी यावेळी केला. गेल्यावर्षी आयपीएलची मालिका सप्टेंबर ते नोव्हेंबर आयपीएल मालिका खेळली गेली. आयपीएलचे जे सामने खेळवले जातात यावर सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. सचिन वाझे यांनी ही रक्कम मागितल्यानंतर त्यांना आणखी एक फोन जातो. आणि ही रक्कम घेतल्यानंतर यात आम्हाला किती रक्कम मिळणार, अशी मागणी या व्यक्तीकडून केली गेली. वरुन सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यातील जे संभाषण आहे ते महत्त्वाचं आहे. या संभाषणाबद्दलची माहिती एनआयएने घ्यावी. कुणाच्या सांगण्यावरुन वरुन सरदेसाई यांनी फोन केले? वरुन सरदेसाई कुणाचे नातेवाईक आहे? वरुन सरदेसाईंवर कुणाचा आशीर्वाद आहे? हे एनआयने तपासावं, असं नितेश राणे यांनी सांगितलं. नितीन सरदेसाई यांची कॉल रेकॉर्ड जोपर्यंत तपासले जात नाहीत तोवर वाझेंच्या मागचा मास्टरमाईंड समोर येणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:08 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here